Bigg Boss Marathi 5: सदस्यांची जिंकली मनं अन् बहुमताने वर्षा उसगांवकरांनी पटकावला या आठवड्याच्या कॅप्टन्सीचा तुरा

Bigg Boss Marathi 5: सदस्यांची जिंकली मनं अन् बहुमताने वर्षा उसगांवकरांनी पटकावला या आठवड्याच्या कॅप्टन्सीचा तुरा

यावेळी कॅप्टन्सीसाठी वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर आणि वैभव चव्हाण या तिघांपैकी वर्षा उसगांवकर यांची बहुमताने बिग बॉसच्या घराची नवीन कॅप्टन म्हणून निवड झाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

बिग बॉसच्या घरात आजवर अनेक अशा गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. त्यादरम्यान सदस्यांची भांडण ही बिग बॉसच्या घरातील आकर्षण बनलं आहे. त्यादरम्यान काही वाद हे घराच्या बाहेर देखील पसरलेले पाहायला मिळाले. निक्की आणि जान्हवीच्या उद्धटपणाचा कळसं संपूर्ण प्रेक्षकवर्गाने पाहिला आहे. त्याबद्दल रितेश देशमुखने देखील प्रत्येक भाऊच्या धक्क्यात या दोघींची शाळा घेतलेलं पाहायला मिळालं आहे. तरी देखील या दोघींच्या तक्रारींना आळा बसला नाही. यादरम्यान आजवर झालेल्या कॅप्टन्सीमध्ये बिग बॉसच्या घरात पहिली कोकणगर्ल अंकिता वालावकर झाली होती.

तिच्या कॅप्टन्सीचं घरातील सदस्यांनी ही कौतूक केलं होत. अंकिता वालावकरनंतर कॅप्टन्सीची धूरी अरबाज पटेलच्या हाती गेलेली पाहायला मिळाली. त्याने देखील त्याच्या हातात आलेली ही जबाबदारी निष्ठेने पार पाडली. तिसऱ्या कॅप्टन्सीसाठी निक्की तांबोळीला संधी मिळाली आणि तिच्या कॅप्टन्सीच्या अंतर्गत घरात काही वेळा खटके देखील उडताना पाहायला मिळाले. यावेळी कॅप्टन्सीसाठी वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर आणि वैभव चव्हाण या तिघांपैकी वर्षा उसगांवकर यांची बहुमताने बिग बॉसच्या घराची नवीन कॅप्टन म्हणून निवड झाली आहे.

या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी जान्हवीला कॅप्टन्सी मिळावी अशी तिची इच्छा असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यावरून ती आत्मविश्वासाने आपलं मत देखील मांडताना दिसत होती. मात्र घरातले तिच्या या मताने सहमत नसल्याचं देखील पाहायला मिळालं. हे तिने केलेल्या पॅडीच्या अपमानामुळे देखील असू शकतं. पण ज्यावेळी कॅप्टन्सीचा निर्णय घेण्याचा अधिकार बिग बॉसने घरातील बाहेर बसलेल्या सदस्यांना दिला त्यावेळी ताई, ताई असा आवाज बाहेरून येऊ लागला आणि बहुमताने घराची कॅप्टन होणारी वर्षा उसगांवकर ही पहिली कॅप्टन ठरली. वर्षा उसगांवकरने बिग बॉसच्या घरातील चौथ्या कॅप्टन्सीचा तुरा पटकावला आहे आणि या निर्णयावर घरातले सदस्य देखील खुश असल्याच पाहायला मिळालं आहे. यावर बिग बॉसच्या सोशल मीडियावर "हमारा नेता कैसा हो… वंडरगर्ल जैसा हो..!" असं कॅप्शन देत वर्षा उसगांवकर यांना कॅप्टन्सी पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच प्रेक्षांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी देखील कमेंट करतं त्यांच कौतूक केलं आहे त्यात ते म्हणाले आहेत, बहुमताने झालेल्या फर्स्ट कॅप्टन इन बिग बॉस, आज अभिनय रंगदेवता यांचा आशीर्वाद कृपा झाल्या सारखं वाटलं जेव्हा वर्षा जी कॅप्टन होणार हे समजले, हार्दिक अभिनंदन वर्षाताई नवा कॅप्टन झाल्याबद्दल, आता बिग बॉस च्या घरी दाखवून द्या की नक्की घर कस चालवल जाते .आणि घरात मोठी व्यक्ती असणे किती महत्त्वाचे आहे, अशा कमेंट करतं चाहत्यांकडून वर्षा उसगांवकरांवर कौतूकाचा वर्षावर झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com